होय बरोबर वाचलं आहे तुम्ही...विसरळूपणा चांगला नाही त्याने अनेक वेळा तुम्ही अडचणीत येऊ शकता पण 'मुद्दामून विसरून जाणे' हे अनेक वेळा सर्वांच्या हिताचे आणि फायद्याचेही असते.
अध्यात्माच्या दृष्टीने विचार केला तर विसरून जाणे ही पहिली पायरी आणि त्या व्यक्तीला 'माफ करणे' ही विसरून जाण्याच्या पुढची पायरी! कदाचित 'माफ करणे' आपल्याला जमेलच असे नाही ... जसं वय वाढतं तशी विचारांची परिपक्वता वाढत जाते आणि एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनही बदलत जातो... कित्येक वेळा मोठी माणसे आपल्याला सांगतात असू दे... दे सोडून नको फारसा विचार करू... म्हणजेच थोडक्यात जे काही वाईट झाले ते विसरून जा आणि पुढे चालायला लागा...किती मानसिक ओझं आणि त्याचा ताण आपण बरोबर घेऊन चालायचं?? त्या पेक्षा विसरण आणि तणावमुक्त राहणे जास्त फायद्याचे..
चला तर मग स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आजपासून योग्य गोष्टी विसरून जायला शिकूया... त्याची प्रॅक्टिस करूया आणि स्वतःची प्रगती करून घेऊ या! अवघड आहे पण जमेल ..
©डॉ. अर्चना बेळवी.
स्त्री रोग तज्ञ
वानवडी और हडपसर पुणे।