क्षिती आणि सोहम आज फार खूष होते. क्षिती ची पाळी चुकली होती आणि सकाळीच केलेल्या प्रेग्नेंसी टेस्ट चा रिझल्ट पॉझिटिव्ह होता म्हणून दोघांनी आज सुट्टी टाकून माझी अपॉईंटमेंट बुक केली होती. दोघंही खूप एक्साईटेड होती त्यांना सोनोग्राफी वर त्यांचं होणारे बाळ बघायचं होतं.
क्षितीला व्यवस्थित तपासून गोळ्या औषध समजावून सांगितली आणि सोनोग्राफी करण्यासाठी पंधरा ते वीस दिवसानंतर पुन्हा यायला सांगितले. सोनोग्राफी ला अजून पंधरा ते वीस दिवस थांबावे लागणार म्हटल्यावर दोघे नाराज झाले. "आत्ताच करू या ना डॉक्टर सोनोग्राफी आम्हाला तर आमचं बाळ कधी एकदा बघू असं झालंय" क्षिती मला म्हणाली.
"क्षिती, गरोदरपणामध्ये प्रत्येक गोष्टीची योग्य अशी एक वेळ असते आणि ती गोष्ट त्या वेळीच करावी लागते म्हणजे अपेक्षित रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात" मी तिला समजावून सांगितले.
क्षिती आणि सोहम आज फार खूष होते. क्षिती ची पाळी चुकली होती आणि सकाळीच केलेल्या प्रेग्नेंसी टेस्ट चा रिझल्ट पॉझिटिव्ह होता म्हणून दोघांनी आज सुट्टी टाकून माझी अपॉईंटमेंट बुक केली होती. दोघंही खूप एक्साईटेड होती त्यांना सोनोग्राफी वर त्यांचं होणारे बाळ बघायचं होतं.
पाळी च्या शेवटच्या दिवसा पासून सहा आठवडे झाल्यावर पहिली सोनोग्राफी करावी ..
पहिला सोनोग्राफी ला viability scan असे म्हणतात.
पोटाच्या वरून किंवा आतून दोन्ही प्रकारे गरोदरपणातील पहिली सोनोग्राफी करतात दोन्ही पद्धतीने केलेली सोनोग्राफी योग्य आहे.
नाही. गरोदरपणातील सोनोग्राफी करताना उपाशीपोटी जाण्याची गरज नाही तुम्ही नाश्ता जेवण करून जाऊ शकता.
सोनोग्राफी ला जाताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्यासाठी दिलेले प्रेस्क्रीप्शन. या प्रिस्क्रिप्शनवर डॉक्टरांचा शिक्का आणि सही आणि कशासाठी सोनोग्राफी करायची हे लिहिलेले असणे कायद्याने बंधनकारक आहे. कित्येक वेळा पेशंट डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रिप्शन विसरून किंवा न घेता येतात आणि त्यामुळे त्यांना सोनोग्राफी न करताच परत जावे लागते.
तसेच स्वतःच्या आधार कार्डचा एखादा फोटो किंवा झेंरॉक्स ही बरोबर असावी..
पहिली सोनोग्राफी करण्यासाठी सर्वसाधारणतः दहा ते पंधरा मिनिटे इतका वेळ डॉक्टरांना लागतो. परंतु त्यानंतर रिपोर्ट आणि सोनोग्राफी बद्दल काही बोलणे तसेच काही शंका असतील तर त्याचे निरसन करणे या सर्व गोष्टी विचारात घेता सोनोग्राफीसाठी जाताना वेळ काढून जाणे गरजेचे आहे.
खरेतर कोणते कपडे घालावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु सोनोग्राफी करण्यासाठी जी पोझिशन द्यावी लागते त्यासाठी पंजाबी ड्रेस हा सर्वोत्तम ड्रेस आहे असे मला वाटते कारण त्यामुळे पोझिशन देणे सोपे पडते.
त्याचे उत्तर बाळाच्या हृदयाची स्पंदने दिसणे असे मी देईन.
बाळाभोवती पाणी किती आहे ? पाळीच्या तारखेप्रमाणे बाळाची वाढ आहे की नाही? तसेच पेशंटच्या डिलीवरीची तारीख नक्की काय आहे या सर्व गोष्टी पहिल्या सोनोग्राफीमध्ये समजतात.
गरोदरपणातील पहिल्या सोनोग्राफी मध्ये वेळ थोडीशी पुढे मागे झाली तरी चालेल परंतु दुसरी सोनोग्राफी जी तीन महिन्याची असते त्या वेळेला मात्र डॉक्टरांनी दिलेल्या तारखांमध्ये बरोबर सोनोग्राफी करणे गरजेचे आहे.
गरोदरपणातील सोनोग्राफी ही पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्यापासून पेशंटला किंवा होणाऱ्या बाळाला काहीही धोका नसतो.
आज आपण गरोदरपणातील पहिल्या सोनोग्राफी विषयी विस्तृत माहिती घेतली तुमचे याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा मला त्या प्रश्नांना उत्तरे द्यायला आवडेल.
©डॉ. अर्चना बेळवी.
स्त्री रोग तज्ञ
स्त्री रोग तज्ञ